अधिनियमातील तरतुदी

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण (MWRRA) अधिनियम,२००५ च्या कलम ११(s) नुसार, प्राधिकरण खालील अधिकार वापरेल आणि खालील कार्य करेल:

“राज्य जल हक्क माहिती संकलन – संग्रह (base) विकसित करण्यासाठी जे राज्यांतर्गत पाण्याच्या वापरासाठी जारी केलेल्या सर्व हक्कांची स्पष्टपणे नोंद करेल, हक्कांचे कोणतेही हस्तांतरण आणि वितरण आणि त्या हक्कांच्या परिणामी केलेल्या वापरांची नोंद करेल.”