सुलभता पर्याय

वापरात असलेले साधन, तंत्रज्ञान किंवा क्षमता लक्षात न घेता संकेतस्थळ सर्व वापरकर्त्यांसाठी सहज वापरता येण्याजोगे आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.  अभ्यागतांना जास्तीत जास्त सुलभता आणि वापरण्यायोग्यता असावी या उद्देशाने ते तयार केले गेले आहे.

 

या संकेतस्थळावरील सर्व माहिती दिव्यांग लोकांसाठी सुलभ असावी हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ, दृष्टीविषयक दिव्यांग वापरकर्ता सहाय्यक तंत्रज्ञान जसे की स्क्रीन रीडर्स आणि भिंग वापरून ही वेबसाइट बघू शकतो.

 

आमचे ध्येय मानकांचे अनुपालन करणे आणि उपयोगिता आणि सार्वत्रिक आराखड्याच्या तत्त्वांचे अनुसरण करणे आहे, जे या संकेतस्थळाच्या सर्व अभ्यागतांना मदत करेल.

 

हे संकेतस्थळ एक्सएचटीएमएल १.० संक्रमणकालीन वापरुन तयार केले आहे आणि वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम (डब्ल्यू3सी) द्वारे निर्धारित केलेल्या वेब मजकूर सुलभता मार्गदर्शक तत्त्वे (डब्ल्यूसीएजी) [२.० Web Content Accessibility Guidelines (WCAG) 2.0] यांचा प्राधान्य १ (स्तर अ) पूर्ण करते. संकेतस्थळामधील माहितीचा काही भाग बाह्य संकेतस्थळांच्या दुव्यांद्वारे देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

बाह्य संकेतस्थळ संबंधित विभागांद्वारे चालू ठेवले जातात जे या संकेतस्थळांना सुलभ करण्यायोग्य बनविण्यासाठी जबाबदार असतात.

 

तुम्हांला या संकेतस्थळांच्या सुलभतेसंदर्भात काही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आम्हाला अभिप्राय पाठवा.