गोपनीयता धोरण

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण संकेतस्थळ आणि या संकेतस्थळावर आधारित अॅप्स तुमच्याकडून कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती स्वयंचलितपणे घेत नाहीत (जसे की नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल पत्ता), ज्यामुळे आम्हाला तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखता येते.

 

जर संकेतस्थळ तुम्हाला वैयक्तिक माहिती प्रदान करण्याची विनंती करत असेल, तर तुम्हाला ज्या विशिष्ट हेतूंसाठी माहिती एकत्रित केली जात आहे त्यासाठी तुम्हाला सूचित केले जाईल आणि तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित करण्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय केले जातील.

 

आम्ही संकेतस्थळावर स्वेच्छेने दिलेली कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती कोणत्याही (सार्वजनिक / खाजगी) तृतीय पक्षास (थर्ड पार्टीस) विकत नाही किंवा सामायिक करीत नाही. या पोर्टलला प्रदान केलेली कोणतीही माहिती तोटा, गैरवापर, अनधिकृत उपलब्धता किंवा प्रकटीकरण, बदल, किंवा हानी यांच्यापासून संरक्षित केली जाईल.

 

आम्ही वापरकर्त्याविषयी काही विशिष्ट माहिती गोळा करतो, जसे की इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ते, डोमेन नाव, ब्राउझरचा प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे.

 

आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीशी आम्ही या पत्त्यांचा दुवा साधण्याचा कोणताही प्रयत्न करीत नाही, जोपर्यंत संकेतस्थळाला नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात नाही.