वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हक्क

 

i) शेतकरी स्वत:च्या पाण्याचा हक्क कसा शोधून काढू शकतो?

 

उत्तरः जो शेतकरी जल वापरकर्ता संघटनेचा सदस्य आहे त्याला जल वापरकर्ता संघटनेच्या पाणी हक्काच्या काही भागाचे हक्क आहेत जे त्याचे वाटप
आहे. हे वाटप संबंधित वर्षाच्या जल वापरकर्ता संघटनेच्या लागू पाण्याच्या हक्कानुसार बदलू शकते. जल वापरकर्ता संघटनेच्या निर्धारित एकक जल वापर हक्क (किंवा प्रति हेक्टर हक्क) याचा शेतकऱ्याच्या धारणाने गुणाकार करून हे प्राप्त झाले आहे. लागू असलेल्या एककाच्या पाण्याच्या हक्कांसाठी कृपया संबंधित वर्षासाठी ‘हक्क नोंदवही पहावी. शेतकरी आपापल्या संबंधित जल वापरकर्ता संघटनेशी देखील संपर्क साधू शकतो..

 

ii. जल वापरकर्ता संघटनेच्या पाण्याचे हक्क कसे ठरवले जाते?

 

उत्तरः कृपया लागू असलेले हक्क आणि हिस्सा (कोट्याची) व्याख्या पहा. हक्कांच्या विभागांतर्गत महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर तपशील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कृपया हक्क नोंदवहीचा संदर्भ घ्यावा.

 

iii. जल वापरकर्ता संघटना हक्कांची गणना कशी केली जाते?

 

उत्तरः प्रत्येक प्रकल्प आणि हंगामासाठी हक्कांची गणना पत्रके आमच्या हक्क नोंदवही मध्ये उपलब्ध आहेत, कृपया त्याचा संदर्भ घ्यावा.

 

iv. एखादा शेतकरी हक्क परवाना कसा अर्ज करु शकतो?

 

उत्तरः प्रत्येक वेळी जेव्हा जल वापरकर्ता संघटनेकडून कोणतीही सूचना मिळते, तेव्हा हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्याला संबंधित जल वापरकर्ता संघटनेकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर अर्जाच्या उत्तरात संबंधित जल वापरकर्ता संघटनेद्वारा हक्क परवाने दिले जातात..

 

प्रकल्प मंजुरी

 

i. पर्यावरणीय मंजुरी न मिळालेला प्रकल्प आरबीएमार्फत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन
प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर करता येऊ शकतो का?

 

उत्तरः होय, आरबीए मंजुरीसाठी प्रकल्प सादर करू शकतो कारण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण केवळ दोन निकषांच्या आधारे प्रकल्प मंजूर करतो म्हणजे: पाण्याची उपलब्धता आणि अनुशेष. तथापि, अंतिम प्रशासकीय मंजूरीपूर्वी, पर्यावरणीय मंजुरी आवश्यक आहे..

 

ii. विशिष्ट मंजुरी प्रकल्पाची विस्तृत माहिती कोठे मिळू शकेल?

 

उत्तरः या संकेतस्थळाद्वारे प्रत्येक प्रकल्पाची सर्व उपलब्ध माहिती मिळू शकते, कृपया प्रकल्प मंजुरी नोंदवहीचा संदर्भ घ्यावा. अधिक माहितीसाठी जलसंपत्ती विभागाशी संपर्क साधावा..

 

दर

 

i. स्वतंत्र ग्राहक जल शुल्काबाबत थेट महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे जाऊ शकतात का?

 

उत्तरः नाही. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण फक्त ठोक जल दराचे व्यवहार करतात. म्हणून, केवळ ठोक जल वापरकर्ते महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे जाऊ शकतात.

 

ii. ठोक जल दर कसे ठरवले जातात?

 

उत्तरः  ठोक जल दर नियमित करण्याचे काम सध्या सुरू आहे. कृपया दरांवरील विभाग पहा..

 

iii. कोणत्याही वेळी ठोक दर बदलले जाऊ शकतात का?

 

उत्तरः ठोक दर प्रत्येक तीन वर्षांनी सुधारित केले जातात.

 

सामान्य

 

i. ठोक वापरकर्ता म्हणजे काय?

 

उत्तरः ठोक वापरकर्ता एक अशी संस्था आहे जी स्वतःच्या वापरासाठी किंवा त्याच्या वैयक्तिक सदस्यांना पुढील वितरणासाठी थेट जलाशय किंवा कालव्यातून पाणी उचलते.

 

ii. महाराष्ट्रात पाटबंधारे ठोक वापरकर्ते कोण आहेत?

 

उत्तरःपाटबंधारे ठोक वापरकर्ते जल वापरकर्ता संघटना आहेत..

 

iii. घरगुती / पिण्याचे पाण्याचे ठोक वापरकर्ते कोण आहेत?

 

उत्तरःमहानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायती , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, इ.

 

iv. औद्योगिक ठोक वापरकर्ते कोण आहेत?

 

उत्तरःएमआयडीसी, इतर औद्योगिक वसाहती, मोठे उद्योग, एमएडीसी नागपूर, साखर सहकारी, इ..

 

v. नैसर्गिक पाण्याचा स्रोत म्हणजे काय?

 

उत्तरःनैसर्गिक पाण्याचे स्त्रोत म्हणजे नद्या, नाले, नैसर्गिक सरोवर, तलाव आणि तत्सम जलसाठा..

 

vi. जलसंपत्ती प्रणाली म्हणजे काय?

 

उत्तरःजलसंपत्ती प्रणाली ही संज्ञा जलसंपत्तीचा वापर करण्यासाठी बनविलेल्या आणि चालविण्यासाठीअसलेल्या रचनांसाठी वापरली जाते. संयुक्त जलसंपत्ती प्रणालीमध्ये धरण, जलाशय, कालवे आणि उप-कालवे यांचा समावेश होतो..

 

vii. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अर्ध-न्यायिक कामांसाठी सीबीआर आहेत का?

 

उत्तरःदर नियमनासाठी सीबीआरची तयारी सध्या सुरू आहे.